कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे आवाहन


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील धार रस्त्यावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक इसमाचे कुजलेले प्रेत आढळून आल्याचा प्रकार सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

अमळनेर शहरातील चिन्मय हॉटेलच्या पुढे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या शेताजवळ झाडाला गळफास घेवून लटकलेला अनोळखी ३२ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली. घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम त्यांचे सहकारी तसेच फॉरेन्सिक पथकाने भेट दिली. दरम्यान मयताचा मृतदेह मिळून आल्याने रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटवावी असे आवाहन अमळनेर पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.