Home Uncategorized रावेर नगर पालिकेची अंतीम प्रभाग रचना जाहीर; इच्छुकांची भेटीगाठी सुरू

रावेर नगर पालिकेची अंतीम प्रभाग रचना जाहीर; इच्छुकांची भेटीगाठी सुरू

0
574

रावेर-शालीक महाजन । रावेर नगरपालिकेची अंतीम प्रभाग रचना आज नगरपालिका कार्यालय येथे जाहीर करण्यात आली आहे. एकूण १२ प्रभाग असुन यामध्ये येणारे भागाची याची माहिती. यात देण्यात आली आहे. रावेर नगर पालिकेत नगराध्यक्ष पद लोकनियुक्त असून रावेर शहरातील ३९ हजार ५३३ मतदार बारा प्रभागातील २४ नगर सेवक तर एक लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना मतदार करणार आहे.

रावेर शहरात नगर पालिकेची निवडणूकी बद्दल चर्चा होण्यास सुरू झाली आहे.इच्छुक उमेदवार मतदार भेट गाठ घेण्यावर जास्त भर देत आहे.यावेळच्या निवडणुकीत बहुतांश युवक इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात असून त्यांची उमेदवारीमुळे प्रस्थापितांना टेंशन मध्ये टाकले आहे.रावेर नगर पालिकेत जाहीर झालेली अंतीम प्रभाग पुढील प्रमाणे आहे.

प्रभाग क्र एक  मतदार संख्या ३४४७
रावेर शहरातील प्रभाग क्रमांक एक महात्मा फुले चौक, भगवती नगर,मरी माता मंदिर,नागझिरी,पोलीस चौकी, मागील भाग

प्रभाग क्रमांक दोन मतदार संख्या ३५३८
यामध्ये छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक प्लॉट नविन एरिया, पाराचा गणपती परिसर,मन्यार वाडा,नेमाडे प्लॉट एरिया,

प्रभाग क्रमांक तीन मतदार संख्या ३०८१
हनुमान चौक, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर,मंगरूळ दरवाजा, भोईवाडा,रथ गल्ली परिसर, बारी वाडा,मोमीन वाडा,दुर्गा माता मंदिर परिसर,

प्रभाग क्रमांक चार मतदार संख्या ३२५८
भोकरीकर गल्ली परिसर,लंगडा मारुती परिसर,संत रोहिदास नगर परिसर, डे सारर्डा जिम परिसर,गजानन नगर,अप्पू गल्ली परिसर,गांधी चौक,मेन रोड,बावीशी गल्ली,

प्रभाग क्रमांक पाच मतदार संख्या ३४९०
डेली भाजी मार्केट भाग,दत्त मंदिर परिसर,अग्रेसर चौक,नालाभाग, बावीशी गल्ली,रिंग रोड भाग,पंचशील नगर,इमाम वाडा भाग,कोतवाल भाग,

प्रभाग क्रमांक सहा मतदार संख्या सहा ३६१९
थडा मारुती परिसर,अब्दुल हमीद चौक परिसर, इमाम वाडा,भाग देशमुख वाडा,नगर गडी, बेलसकर वाडा, आणि पाराचा गणपती परिसर,

प्रभाग क्रमांक सात मतदार संख्या ३२२३
लतीफ हॉल,शंकर प्लॉट, नगरपालिका परिसर,योगा हॉल,नागझिरी नदी परिसर भाग उटखेडा रोड, सप्तशृंगी देवी परिसर व ईदगाह रसलपूर रोड भाग

प्रभाग क्रमांक आठ मतदार संख्या ३२६२
हुसेनी मशीद भाग,कौसर मशीद भाग,मरकज मशीद भाग,पाण्याची टाकी भाग, उटखेडा रोड भाग

प्रभाग क्रमांक नऊ मतदार संख्या ३०२५
सावदा बुरहानपुर रोड,सावदा नाका, हुसेनी मशीद भाग, अष्टविनायक नगर,विठ्ठल मंदिर भाग,

प्रभाग क्रमांक दहा मतदार संख्या ३२२३
उटखेडा रोड,परिसर जुना सावदा रोड परिसर, तिरुपती नगर, पीपल्स बँक कॉलनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर,

प्रभाग क्रमांक अकरा मतदार संख्या ३३१३
अष्टविनायक नगर,साई मंदिर परिसर,जी एस कॉलनी भाग,फिल्टर भाग परिसर, सौभाग्य नगर,स्वामी शाळा परिसर,रामचंद्र नगर,गजानन महाराज मंदिर परिसर,

प्रभाग क्रमांक बारा मतदार संख्या ३०५४
व्ही एस नाईक परिसर, स्वामी समर्थ केंद्र परिसर, विद्यानगर ,सोनू पाटील, नगर शनी मंदिर कॉलनी, मराठा मंगल कार्यालय परिसर ,आदर्श नगर, रेल्वे स्टेशन भाग, स्टेशन रोड,आणि शिक्षक कॉलनी परिसर

तरुण इच्छुकांमुळे प्रस्थापितांना चिंता:

अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांची रणनीती निश्चित होणार आहे. विशेषतः तरुण उमेदवारांच्या वाढत्या संख्येमुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


Protected Content

Play sound