यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ गावातील अनेक मुस्लीम तरूणांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
यावल तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मारूळ या गावातील असंख्य मुस्लीम तरूणांनी भारिप बहुजन महासंघाचे जळगाव जिल्हा सचिव दिपक मेघे, भारिप बहुजन संघाच्या युवा शाखा तालुका अध्यक्ष सचिन बाऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित आघाडीचे सदस्यत्व स्विकारले आहे. याप्रसंगी मारूळ येथील तरुणांनी प्रवेश केला, एमआयएमचे शाकीर खान, यावल तालुका अध्यक्ष आकाश तायडे तालुका कार्यध्यक्ष सनी मेघे, आय .टी. सेलचे धिरज मेधे, आभिजीत तायडे आदी पदाधिकारी शाखाप्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, ऑक्टोबर महिन्यात होवु घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या गडाला सुरूंग लावण्याची ही खेळी असल्याची प्रतिक्रीया काही जाणकारांनी दिली.