
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरापासून जवळ असलेल्या हेडावे रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आहे. यात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीवरील तिघांना उडविल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रस्त्यावरील वाहन धारकांनी मदत कार्य सुरू केले असून जखमीस अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरपासून जवळ असलेल्या हेडावे रस्त्यावरून दुचाकीवर तिन जण जात असतांना गुरूवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमळनेर तालुक्यातील एकरूखी येथील दाम्पत्य जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमीस रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेले नाही.



