Home क्रीडा जळगाव जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जैन स्पोर्ट्स आणि मॅप्स अकॅडमीचा दणदणीत विजय 

जळगाव जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जैन स्पोर्ट्स आणि मॅप्स अकॅडमीचा दणदणीत विजय 

0
187


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडच्या प्रायोजकत्वाखाली पार पडलेल्या जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये जैन स्पोर्ट्स आणि मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात आली.

ही स्पर्धा जळगावच्या प्रसिद्ध खेळाडू स्व. अविनाश दामले यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील वयोगटातील मुले आणि मुली तसेच ३५+ पुरुष आणि महिला गटात एकूण १८४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व गटांत जैन स्पोर्ट्स आणि मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू आघाडीवर राहिले.

या स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू हेमराज लवांगे आणि ओवी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विजेते आणि उपविजेते खेळाडूंना जैन इरिगेशनच्या वतीने आकर्षक चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास आयशा खान (आंतरराष्ट्रीय कॅरमपटू), जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे आणि प्रशिक्षिका दीपिका ठाकूर हे मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे संयोजन आणि पंच समितीच्या कामगिरीतही अत्यंत कौशल्य दिसून आले. मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहकार्याने जाजिब शेख, पुनम ठाकूर, मशरूक शेख, फाल्गुन पाटील, श्वेता धामके, तेजल भालेराव, शुभम चांदसरकर, कोनिका पाटील, ओवी पाटील आणि श्लोक जगताप यांनी पंच म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रशिक्षक किशोर सिंह यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर विजेत्यांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी आणि प्रशिक्षक किशोर सिंह यांनी विशेष शुभेच्छा व कौतुक केले.


Protected Content

Play sound