Home क्राईम संतापजनक : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ; व्हिडिओ व्हायरल करून बदनामी

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ; व्हिडिओ व्हायरल करून बदनामी

0
316

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तीन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. इतकेच नाही तर, अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांनी पीडित मुलीची बदनामी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीनही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

अत्याचारानंतर बदनामीची धमकी
पीडित मुलीला धमकावून हे कृत्य करण्यात आले. अत्याचाराच्या या धक्कादायक प्रकारानंतर आरोपींनी पीडितेची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, या नराधमांनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून मुलीची बदनामी केली. यामुळे पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तिन्ही आरोपींना अटक
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावले उचलली आणि तिघांना अटक केली. नवनाथ दादाभाऊ सोनवणे, दीपक नाना मोरे आणि पवन रावसाहेब मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound