Home Uncategorized उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी

0
201


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत रविवारी पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज रात्री उशीरा जळगावात दाखल होणार आहेत. आल्याबरोबर ते जैन हिल्स येथे मुक्कामाला थांबणार आहेत. उद्या रविवारी पहाटे पवार हे प्रारंभी चिंचोली येथील मेडिकल हबची पाहणी करणार आहेत. यानंतर ते राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर जे शिवतीर्थ मैदानावर ‘समृध्द खान्देश मेळाव्या’ला संबोधित करणार आहेत.

या मेळाव्यात अजितदादा पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकतील असे मानले जात आहे. तर याच कार्यक्रमात अनेक नेते आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत.

दरम्यान, अजितदादा पवार यांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवतीर्थ मैदानावरील मेळाव्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्यांनी जोरदार नियोजन केल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound