
धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरी जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या एका प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र डोंगर पाटील वय ४८ रा. हनुमान नगर, जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र पाटील हे आपल्या कुटुंबियांसह हनुमान नगरात वास्तव्याला होतो. ३ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हे धान्य मार्केट येथून घरी जाण्यासाठी निघाले. रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्यांना धावत्या रेल्वेचा धक्का लागला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोमवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र चव्हाण हे करीत आहे.



