Home क्राईम गावठी पिस्तूलासह तरूण जेरबंद; जळगाव एलसीबीची कारवाई

गावठी पिस्तूलासह तरूण जेरबंद; जळगाव एलसीबीची कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील रणगाव (ता. रावेर) येथे एका तरुणाला अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. हा तरुण गावात पिस्तूलाच्या जोरावर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना रणगाव येथील एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल कमरेला लावून गावात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संदीप पाटील यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ प्रीतम पाटील, पोकॉ बबन पाटील, पोकॉ सचिन घुगे, पोकॉ प्रदीप सपकाळे, चापोहेकॉ भारत पाटील यांचे एक पथक तयार करून रणगाव येथे रवाना केले.

पथकाने रणगावात सापळा रचून संशयित किरण ब्रिजलाल कोळी (वय २४, रा. रणगाव, ता. रावेर) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४०,००० रुपये किमतीचे गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर आढळून आले. पोलिसांनी तात्काळ हे पिस्तूल जप्त करून किरण कोळी याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या किरण कोळी याला पुढील कारवाईसाठी सावदा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. पोकॉ सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ नितीन बाविस्कर, पोना विकास सातदिवे, पोकॉ मयुर निकम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound