Home Cities जळगाव जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे; पशुपालकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे आवाहन

जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे; पशुपालकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे आवाहन

0
189


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील २८ वेगवेगळ्या गावांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या तपासणीत ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या २८ गावांमध्ये जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले असून, परिसरातील इतर जनावरांनाही प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता दिली आहे.

लम्पी हा जनावरांमध्ये वेगाने पसरणारा विषाणूजन्य आजार असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. बाधित गावांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक सातत्याने लक्ष ठेवून आहेत. बाधित जनावरांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार दिले जात आहेत, तसेच हा आजार इतर ठिकाणी पसरू नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले आहे की, पशुपालकांनी आपल्या जनावरांमध्ये लम्पी आजाराची कोणतीही लक्षणे (उदा. ताप येणे, त्वचेवर गाठी येणे, खाणे-पिणे बंद करणे) दिसल्यास तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. प्रशासनाच्या या जलद कार्यवाहीमुळे लम्पी आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound