जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खंड पडलेल्या पावसामुळे शेतकरी जरी संकटात असले तरी येत्या काही दिवसात हवामान पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अडचण दुर होणार आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलत होता.
या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या रासायनिक खतांचा पुरवठा प्रत्येक तालुकास्तरावर पुरेसा उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांकडून विहित व्याजदरापेक्षा जास्त किमतीत खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि खतांच्या योग्य किमतीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एक विशेष हेल्पलाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या अनियमितता किंवा कमतरतेबाबत कोणतीही अडचण आल्यास, ते या हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या रासायनिक खतांच्या गैरव्यवहारावर मात करणे शक्य होणार असून, त्यांना वेळेवर आणि योग्य दरात खते मिळतील, अशी अपेक्षा आहे.



