Home क्राईम तरूणाचे बंद घर फोडून सव्वा लाखांचे दागिने लांबविले !

तरूणाचे बंद घर फोडून सव्वा लाखांचे दागिने लांबविले !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहन नगरात तरूणाचे बंद घर फोडून घरातून १ लाख २९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरूवारी १७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता उघडकीला आली. याबाबत शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र राजेंद्र खर्चाने वय ३९ रा. मोहन नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवारी १७ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सुमारे १ लाख २९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. रात्री १० वाजता जितेंद्र खर्चाने हे घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशिवरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound