Home क्राईम भरधाव डंपरची बसला धडक : चालकासह प्रवासी जखमी

भरधाव डंपरची बसला धडक : चालकासह प्रवासी जखमी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l गौण खनिज वाहून नेणाऱ्या वेगवान डंपरने बसला धडक दिली असून यात चालकासह सात प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की मुक्ताईनगर डेपोची मुक्ताईनगर ते मलकापूर ही बस आज दुपारी मलकापूर कडे जात होती. दरम्यान गौण खनिज घेऊन अतिशय भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने या बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बसचा चालक गंभीर जखमी झाला असून अन्य सात प्रवासी देखील जखमी झालेले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. तरोडा ते रुईखेडा या गावांच्या मध्ये हा अपघात घडला असून परिसरातील ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.


Protected Content

Play sound