Home Cities जळगाव कानळदा येथे उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आयोजन

कानळदा येथे उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आयोजन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, उद्या, २६ जून रोजी जळगाव तालुक्यातील मौजे कानळदा (महर्षी कण्व आश्रम) येथे *’छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’च आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हे शिबीर सुरू होईल.

या मोहिमेचा मुख्य उद्देश गतिमान प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावणे हा आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांचे महसूल, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्वरूपाचे प्रश्न त्वरित सोडवले जाणार आहेत.

शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शिबिरात येताना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असेही प्रशासनाने कळवले आहे.


Protected Content

Play sound