Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘रॅगिंग प्रतिबंध’ मार्गदर्शन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘रॅगिंग प्रतिबंध’ मार्गदर्शन

0
133


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीच्या वतीने पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ‘रॅगिंग प्रतिबंध’ या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात आयोजित या बैठकीत सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अँटी रॅगिंग कमिटीचे चेअरमन तथा अधिष्ठाता डॉ. प्रकाश सोळंके आणि वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. व्यासपीठावर कमिटीचे सदस्य तथा रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. विलास चव्हाण, गर्ल्स होस्टेल रेक्टर अर्चना भिरूड व ज्योत्स्ना भिरूड, बॉइज होस्टेल रेक्टर सुरेंद्र गावंडे आणि विद्यार्थी प्रतिनिधी पीयूष कुकडे यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक कायदे आणि त्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कठोर कारवाई विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाविद्यालयातील नवोदित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


Protected Content

Play sound