Home Cities जळगाव जिल्हा परिषदेचा पशुधनासाठी महत्त्वाचा निर्णय; ३३ दवाखान्यांमध्ये खोडा शेड उभारणार

जिल्हा परिषदेचा पशुधनासाठी महत्त्वाचा निर्णय; ३३ दवाखान्यांमध्ये खोडा शेड उभारणार

0
188


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पशुधनाची योग्य काळजी घेण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील १५२ पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी ३३ दवाखान्यांमध्ये खोडा शेड उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या निधीतून ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पशुधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पशुधनाची काळजी घेणे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात एकूण १५२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पशुधनाचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावे, तसेच त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करणे सोपे जावे, यासाठी मिनल करनवाल यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील १५२ पैकी ३३ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये खोडा शेड उभारले जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ४९ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्ह्यात ७८ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये खोडा शेडची सोय उपलब्ध आहे. आता या नवीन निर्णयामुळे उर्वरित ७४ पैकी ३३ दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

खोडा शेडमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पशुधनाची आणि त्यांच्या मालकांची गैरसोय टळणार आहे. पशुधनाला सुरक्षित वातावरणात उपचार घेणे शक्य होणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


Protected Content

Play sound