Home क्राईम प्रेमभंगातून तरुणाने स्वतःला संपवलं; महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रेमभंगातून तरुणाने स्वतःला संपवलं; महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार

0
149

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात प्रेमभंगाच्या नैराश्यातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार, २७ एप्रिल) सकाळी ८ वाजता उघडकीस आली. मृत विद्यार्थ्याचे नाव सत्तू कोळी असून, त्याचे पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी सत्तूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सकाळी काही विद्यार्थ्यांच्या लक्षात ही घटना येताच महाविद्यालय प्रशासन व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मयताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी जिल्हा पेठ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Protected Content

Play sound