जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दारुच्या नशेत असलेल्याने मदन अमृतलाल जैन (वय ५४, रा. कुसुंबा, गणपतीनगर) यांना दगड मारुन त्याच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत केली. ही घटना २३ रोजी दुपारी कुसुंबा आईस्क्रिम फॅक्टरीजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात मदन जैन हे वास्तव्यास असून त्यांचा कटलरीचा व्यवसाय आहे. २३ एप्रिल रोजी दुपारी ते पत्नीसह आईस्क्रीम फॅक्टरी परिसरात गेले होते. त्यावेळी कुणाल पाटील नामक इसम हा दारुच्या नशेत त्यांच्याजवळ आला. त्याने तुम्ही इथे काय करीत आहे असे म्हणत तेथे पडलेला दगड मदन जैन यांना मारला. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत होवून ते जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीला देखील दगड मारुन जखमी केलजे. तसेच पोलीस ठाण्यात गेले तर जीवे ठार मारण्याची त्याने धमकी दिली. याप्रकरणी २५ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मदन जैन यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित कृणाल पाटील रा. कुसुंबा ता. जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहे.