Home क्राईम मध्यरात्री उघड्या घरातून दोन महागडे मोबाईलची चोरी

मध्यरात्री उघड्या घरातून दोन महागडे मोबाईलची चोरी

0
117

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील साईनगरमध्ये तरुणाचे बंद घराचा दरवाजा उघडून घरातून २० हजार रूपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना रविवारी २० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता समोर आले आहे. या संदर्भात रात्री ८ वाजता जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामेश्वर गब्रू पवार (वय-२५, रा. साईनगर, एमआयडीसी, जळगाव) हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत वास्तव्याला आहे. खाजगी कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. १९ एप्रिल ते २० एप्रिलच्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन घरातून २० हजार रुपये किमतीचे २ महागडे मोबाईल चोरून नेले. ही घटना रविवारी २० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता समोर आली. या संदर्भात रामेश्वर पवार यांनी एमआयडीसी तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.


Protected Content

Play sound