महिलेच्या गळ्यातील दोन लाखांची सोन्याचे मंगळसुत्र धुमस्टाईल लांबविले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दूध फेडरेशन रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ९० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे या संदर्भात सकाळी ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्ना किरण पाटील (वय-४३, रा. छत्रपती शिवाजीनगर जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान सकाळच्या शतपावली करण्यासाठी त्या नेहमीप्रमाणे रविवारी २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पायी निघाल्या होत्या. त्यावेळी दूध फेडरेशनवरील रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदिरासमोरून त्या पायी जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ९० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्र हाताने खेचून चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान या संदर्भात महिलेने तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहे.

Protected Content