Home क्राईम गिरणा नदी पात्रातून विहिरीतून ईलेक्ट्रीक पाणबुडी आणि केबल वायरची चोरी

गिरणा नदी पात्रातून विहिरीतून ईलेक्ट्रीक पाणबुडी आणि केबल वायरची चोरी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदी पात्रातील विहिरीतून इलेक्ट्रिक पाणबुडी आणि केबल वायर असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवार १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. या संदर्भात शुक्रवारी १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपत्रात एका विहिरीत पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर लावण्यात आली आहे. ही विहीर शेतमालक गोपाळराव बाबुराव देवकर यांची आहे. दरम्यान १६ एप्रिल ते १७ एप्रिल च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या विहिरीतील इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर आणि केबल वायर असा मुद्देमाल चोरून नेली. ही घटना गुरुवार १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आली. या संदर्भात शुक्रवारी १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound