Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न : नराधम अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न : नराधम अटकेत

0
112

भुसावळ-प्रतिनिधी | शहरातील एका भागातल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात सहा वर्षाची बालिका खेळत असतांना नूर मोहंमद ( वय ४० वर्षे ) याने सार्वजनीक शौचालयात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या बालिकेने तेथून कसा तरी पळ काढून आपल्या आईला याबाबत माहिती दिली. या महिलेने बाजारपेठ पोलीस स्थानक गाठत फिर्याद दिली. यानुसार आरोपी नूर मोहंमद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटना घडताच नूर मोहंमद याने घटनास्थळावरून पळ काढला. त्याला अमळनेर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मंगेश जाधव हे करत आहेत.


Protected Content

Play sound