Home क्राईम कारण नसतांना तरूणाला दोघांकडून दगडाने मारहाण

कारण नसतांना तरूणाला दोघांकडून दगडाने मारहाण

0
112

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून बगीचा येथे काहीही कारण नसताना एका तरुणाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याची घटना मंगळवार २५ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात बुधवारी २६ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आकाश शांताराम भोई वय-२२, रा. कुंभारवाडा, मेहरून जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान मंगळवारी २५ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता आकाश हा जळगाव शहरातील मेहरूण बगीचा येथे गेलेला होता. त्यावेळी काही कारण असताना संशयित आरोपी सोहम ठाकरे आणि विक्रम धनसिंग शिंदे दोन्ही रा. जळगाव यांनी शिवीगाळ करत हातातील दगड डोक्यावर मारून दुखापत केली. दरम्यान या संदर्भात आकाश भोई यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी २६ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील करत आहे.


Protected Content

Play sound