Home Cities अमळनेर किरकोळ कारणावरून तरूणावर लोखंडी विळ्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून तरूणावर लोखंडी विळ्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

0
114

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील धानोरा गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत लाकडी दांडा आणि लोखंडी विळ्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी १.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरालाल विश्वास भिल वय-३६, रा. धानोरा ता. अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता हिरालाल हा त्याच्या दुचाकीने गावातून जात असताना गावात राहणारा छबिलाल रामदास सोनवणे, भोल्या रामदास सोनवणे, संतोष रामदास सोनवणे आणि अनिताच्या बिलाल सोनवणे सर्व रा.धानोरा ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच लाकडी दांडका आणि लोखंडी विळ्याने वार करून दुखापत केली आहे. दरम्यान या घटने संदर्भात हिरालाल भील याने मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांवर दुपारी दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनील आगोणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound