Home Agri Trends अंजाळे येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची आढावा बैठक

अंजाळे येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची आढावा बैठक


anjale

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे गावात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आढावा आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन बैठक घेण्यात आली.

या संदर्भात येथील महसुल प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या माहीतीनुसार आज १२ जुलै रोजी दुपारी २ वाजता अंजाळे येथील जगन्नाथ महाराजांच्या समाधीस्थळ मंदीरात यावल चे निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांच्या प्रमुख उपस्थित शासनाची शेतकरी बांधवांसाठी लागु केलेल्या महत्वपुर्ण प्रधानमंत्री विकास सन्मान योजनेव्दारे दिल्पा जाणाऱ्या अनुदाना संदर्भातील लागणारे विविध कागदपत्रांची जुळवा जुळवी करण्यासाठी यावल तालुक्यात फैजपुर विभागाचे प्रांत आधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांच्या आणी प्रत्येक विभागातील मंडळ अधिकारी तसेच तलाठी, कृषी सहाय्यक, व ग्रामसेवक यांच्या सहकार्यातुन युद्धपातळीवर मोहीम राबीवली जात आहे. या मोहिमेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या आढावा बैठकीत शेतकरी बांधव महीला व त्यांचे कुटुंब मोठया संख्येने उपास्थित होते.


Protected Content

Play sound