Home क्रीडा मनस्वीची ऊशूमध्ये उत्तुंग भरारी! राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक

मनस्वीची ऊशूमध्ये उत्तुंग भरारी! राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑल महाराष्ट्र ऊशू असोसिएशन पुणे यांच्याद्वारे नुकतेच आयोजित खेलो इंडिया अस्मिता राज्यस्तरीय निवड चाचणी भिवंडी, मुंबई येथे घेण्यात आली. या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. जळगाव जिल्हा पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू कुमारी मनस्वी संदीप तायडे हिने सांशू या प्रकारात -५६ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले.

मनस्वी ही पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू असून तिच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलिस अधिकारी जळगाव भाग संदीप गावित, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवाल, सहाय्यक पोलिस निरीक्षक वेलफेअर योगिता नारखेडे, रावसाहेब गायकवाड, पप्पू देसले यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/जंजाळे, जागृती काळे/महाजन, राजेंद्र जंजाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. मनस्वीच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे.


Protected Content

Play sound