Home क्राईम क्रिप्टो ट्रेडींग नावाखाली तरूणाची नऊ लाखांची ऑनलाईन फसवणूक

क्रिप्टो ट्रेडींग नावाखाली तरूणाची नऊ लाखांची ऑनलाईन फसवणूक


जळगाव लाईव्ह ट्रेडींग न्यूज प्रतिनिधी । क्रिप्टो ट्रेडींग करण्याचे टास्क देवून नफा मिळवून देण्याच आमिष दाखवत सुरूवातीला नफा देवून पुन्हा गुंतवणूक करून ९ लाख १२ हजार ११४ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रगत गोपाल गाडीलोहार वय २४ रा. पाचोरा या तरूणाला ३ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन व्हाटसॲप व टेलीग्रामवरून संपर्क साधून त्यांना क्रिप्टो ट्रेंडींग करण्याचे टास्क देवून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. प्रगत यांनी सुरूवातीला गुंतविलेल्या ४०३० रूपयांवर ५ हजार ८३९ रूपयांचा परतावा दिला. यावर प्रगत यांनी विश्वास ठेवून वेळोवेळी एकुण ९ लाख १२ हजार ११४ रूपये गुंतविले. यात त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound