वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरात रमामाता आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आले आहे. यावेळी संतप्त जमावाने शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळपासून वरणगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.


सिद्धेश्वर नगरात रमामाता आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत गाणे वाजवण्यावरून काही समाजकंटकांनी वाद घालून दगडफेक केली. ज्यात सात ते आठ जण जखमी झाले.यावेळी विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी आंदोलनकर्त्यांना आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देत शांत केले आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी वरणगाव पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी जमा झाली होती.


