हद्दपार गुन्हेगार ‘चॅम्पीयन’ला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पंचशील नगरात हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील हद्दपार गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुसावळ शहरात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पंचशील नगर भागात हद्दपार इसम आकाश उर्फ चॅम्पियन फिरत आहे.

या माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (वय २४, रा. पंचशील नगर, भुसावळ) याला ताब्यात घेतले. त्याने उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी शरद बागल, पोह कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ, भारत पाटील यांनी केली आहे.