Home धर्म-समाज वरणगावमध्ये ३९६ वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण

वरणगावमध्ये ३९६ वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जनमाणसाच्या मनामनात भक्तीचा जागर निर्माण करत आणि सनातन धर्माच्या बळकटीसाठी वासुदेव परिवार, वरणगाव यांच्या वतीने 396 वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.

ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित हा कार्यक्रम वरणगावमधील रेवा कुटी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पंचमुखी हनुमान पूजन आणि सामूहिक रामस्तुतीने करण्यात आली. यानंतर उपस्थित भाविकांनी एकत्र येऊन 11 वेळा हनुमान चालीसाचे पठण केले. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावले होते.

कार्यक्रमानंतर आरती आणि प्रसाद वितरण करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले ते दीपक फेगडे यांच्या कडून सर्व भाविकांना लावण्यात आलेले श्रीरामाचे टिळे. तबल्यावर कुणाल शिंदे यांनी संगीतमय साथ देत कार्यक्रमाची भक्तिमयता वाढवली. तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. विशाखा बेंडाळे, डॉ. रविंद्र माळी, उषा राणे, रुपाली महाजन, नयना पाटील, प्रीती महाजन, सुमती पाटील, चेतन पाटील, पियुष महाजन, दीपक फेगडे, चैताली फेगडे, सेजल फरकाडे, डॉ. अनिल शिंदे, राम शेटे, कमलेश येवले, सुयोग चौधरी, प्रसाद चौधरी, अनिकेत चव्हाण, मानसी गोसावी, किरण चौधरी आदी उपस्थित होते.

संजय महाजन, कल्पेश वराडे, कृष्णा चौधरी, डॉ. नितु पाटील, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, दीपक फेगडे यांच्या अथक प्रयत्नामुळे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला. जया एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झालेल्या या भक्तिमय उपक्रमाची पुढील योजना जाहीर करताना डॉ. अनिल शिंदे (सदस्य, वासुदेव परिवार, वरणगाव) यांनी सांगितले की, “हा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रम आता दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नियमितपणे आयोजित केला जाणार आहे. भाविकांनी या भक्तिपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


Protected Content

Play sound