Home Cities धरणगाव कोरी/कोळी सामाजिक एकता न्यू दिल्लीच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी राजू बाविस्कर

कोरी/कोळी सामाजिक एकता न्यू दिल्लीच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी राजू बाविस्कर


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील पत्रकार राजू बाविस्कर यांची कोळी सामाजिक एकता न्यू दिल्लीच्या धरणगाव तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राहुल इशी (शिरपूर), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मानिनी वरलीकर महाराष्ट्र महिला विंग प्रदेशाध्यक्ष मुंबई ,नरेश भाई कोळी प्रदेश उपाध्यक्ष उरण, उपरोक्त निवडीचे प्रा. चंद्रकांत डी. सोनवणे आमदार चोपडा यांच्या आदेशाने व  लताताई सोनवणे माजी आमदार, रितू बनोधा मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष, हरीश भाई वाघेला मुख्य राष्ट्रीय महासचिव, ईरामणी पूरर्वैया राष्ट्रीय अध्यक्ष महिला विंग, संजीव शिरसाठ चोपडा राष्ट्रीय उपाध्यक्ष, मीराताई कोलटेके राष्ट्रीयमहामंत्री महिला विंग (अमरावती), जनार्दन सपकाळे (विदगाव) राष्ट्रीय महामंत्री, घनश्याम भाई शाक्यवार प्रदेशाध्यक्ष मध्य प्रदेश, गिताताई कठोरकर मलकापूर महिला विंग प्रदेश सरचिटणीस, सौ. अनिताताई सपकाळे जळगाव प्रदेश महिला विंग उपाध्यक्ष, सौ. शर्मिलाताई कोळी (उरण), महाप्रदेश महामंत्री महिला विंग हेमांगी ताई बंगाल रत्नागिरी महिला विंग प्रमुख कोकण विभाग शिवप्रसाद भांडे (अकोला), किरण देवराज संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली आहे.

अशा आशयाचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे समाजाच्या हितासाठी अन्यायवृत्त आवाज उठवण्यासाठी न्याय हक्कासाठी ही संघटना नेहमी तत्पर असते श्री. राजू बाविस्कर यांची समाजाच्या हितासाठी भारतीय संविधानाला अभिप्रेत, शाश्वत विकासासाठी, सामाजिक न्याय हक्कासाठी, संरक्षणासाठी, प्रशासकीय बेजबाबदार पणा अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी तसेच सामाजिक क्षेत्रातून ऊपेक्षित वंचित व दुर्लक्षित यांच्या प्रश्नांना समोरे जाऊन अन्यविरुद्ध आवाज उठवून वाचा फोडण्याच्या कामातून आणि विविध सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन समाजाप्रती असलेली भावना लक्षात घेऊन यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून ही पावती संघटनेने दिली आहे संघटनेच्या माध्यमातून अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवून उपेक्षित, दुर्लक्षित दुर्लक्षिकांना न्याय मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया राजू बाविस्कर (कोळी) यांनी दिली आहे. या नियुक्तीतून संपूर्ण तालुक्यातील व आप्तेष्ट मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत असून त्यांच्यावरती शुभेच्छांच्या वर्षा होत आहे.


Protected Content

Play sound