जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात मणक्याची गादी सरकणे, फॅक्चर गाठ, टी.बी, जंतूसंसर्ग, वेडवाकडे होणे, स्पॉन्डिलायसिस, स्पाईनल स्टेनोसिस, हातापायाला मुंग्या येणे, सायटिका मणक्यांच्या त्रस्त असलेल्या रूग्णांना एमजेपीजेवाय योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहे.


गुडघा किंवा खुब्याच्या वेदनेने त्रस्त असलेल्या रूग्णाना दिलासा देण्यासाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. टोटल हिप (खुबा बदल) रिप्लेसमेंट टोटल नी (गुडघा बदल) रिप्लेसमेंट करण्यात येणार आहे.
प्रख्यात फिजिओथेरेपीस्ट तज्ञांकडून मोफत सल्ला, एम. आर. आय. सवलतीच्या दरात करता येणार आहे. नाव नोंदणीसाठी डॉ. अंकीत ९९२३६६०१११,डॉ. शुभम ९३७३८८३७१७, डॉ. गौतम ८६२६०३३४८८ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


