मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि मराठा दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा सकल मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “संक्रांतीचा उत्सव हा समाजाला एकत्र जोडणारा आहे. अशा उपक्रमांद्वारे सामाजिक एकोपा अधिक बळकट होतो.” अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “शिवरायांचे नेतृत्व आणि शिकवण समाज प्रगतीसाठी सदैव प्रेरणा देणारी आहे.”
मुक्ताईनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. मराठा समाजाने एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा उत्सव साजरा केला.
बोदवड नगरपरिषद चे नगराध्यक्ष आनंदराव पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, कुऱ्हा काकोडा सकल अध्यक्ष मराठा समाजाचे नवनीत पाटील, यु.डी. पाटील, मराठा वस्तीग्रह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, राम रहीम रोटीचे अध्यक्ष किशोर गावंडे, मुक्ताईनगर व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन बंटी जैन, भोई समाजाचे तालुकाध्यक्ष छोटूभाऊ भोई, मुस्लिम समाज मनियर बिरादरी जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, डॉ.विजय पाटील, अतुल जनावरे, सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक डॉ. प्रदिप पाटील, रामभाऊ पाटील, मुक्ताई इलेक्ट्रॉनिकचे संचालक श्रीकांत पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, चिखली सरपंच वैभव पाटील, शेमळदा दिलीप श्रीराम पाटील, इच्छापुर सरपंच गणेश थेटे पाटील, संत तुकाराम महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील, डॉ. पवन बनिय, रुईखेडा राजू बगाळे, सतोड प्रविण डाहके तरोडा, विजय पाटील, प्रमोद अमलदार, पंकज कोळी, डी.के.पाटील, दीपक जाधव, भागवत चौधरी, शैलेश पाटील, दीपक वाघ, विनोद दयाराम पाटील, सतिष नागरे, किशोर पाटील, भूषण पाटील, शेख सलीम शेख रहीम, दिनकर पाटील, सुधाकर पाटील, मोहन पाटील, सुनील महाजन, गोपाळ पाटील, जितु पाटील, मनोज पाटील, प्रभाकर पाटील, मुक्ताईनगर के.डी. पाटील, चंदन चौधरी, श्रीकृष्ण फुंडकर, भागवत पाटिल, साहेबराव पाटील, ललित बाविस्कर, संतोष पाटील,ब्रिजलाल, हिरसिंग चव्हाण, दिलीप पाटील, जितेंद्र मोहरे, वैभव कोल्हे, सचिन पाटील, गजानन पाटील आदी उपस्थित होते.
या विशेष सोहळ्यात मराठा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आणि मराठा समाजाचे योगदान अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप माळू पाटील, जितेंद्र मोहरे, वैभव कोल्हे, सचिन पाटील, गजानन पाटील ढोन आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी आणि समाजबांधवांनी यशस्वी कार्यक्रमाचे कौतुक केले. पुढील वर्षीही असा सामाजिक व सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.