मुक्ताईनगर आगाराला मिळणार १७ इलेक्ट्रीक बस : आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येथील एस.टी. आगाराला १७ इलेक्ट्रीक बस मिळणार आहेत.

पर्यावरण पूरक विद्युत प्रणालीवर चालणार्‍या १७ इलेक्ट्रिक बस मुक्ताईनगर आगारासाठी लवकरच प्राप्त होणार असून यासाठी १७ चार्जिंग स्टेशन साठी मंजुरी मिळाली आहे. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा तसेच पत्र व्यवहार करून मुक्ताईनगर ते जळगाव प्रवासी वाहतुकीसाठी मुक्ताईनगर बस आगार अंतर्गत इलेक्ट्रिक बसेसची मागणी केलेली होती. या मागणीला परिवहन मंत्रालयातर्फे हिरवी झेंडी मिळालेली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक खाते यांच्या दिनांक १३.४.२०१३ च्या प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार मुक्ताईनगर आगारासाठी उपलब्ध होणार्‍या सतरा बसेस साठी स्वतंत्ररीत्या १७ चार्जिंग स्टेशनची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसात १७ चार्जिंग स्टेशनचे काम युद्ध पातळीवर सुरू होणार असून तसेच यानंतर मुक्ताईनगर आगारासाठी १७ इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यात मुक्ताईनगर ते जळगाव प्रवास करणार्‍या प्रवाशांना देखील पर्यावरण पूरक व स्वस्त सुरक्षित प्रवास मिळणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.

Protected Content