Home Uncategorized जळगावमधील खान्देश कॉम्प्लेक्समध्ये दुकान फोडले

जळगावमधील खान्देश कॉम्प्लेक्समध्ये दुकान फोडले

8e84079e 67ba 4fa6 a962 6ca94541a04d
8e84079e 67ba 4fa6 a962 6ca94541a04d

8e84079e 67ba 4fa6 a962 6ca94541a04d
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समध्ये कपड्यांचे दुकान फोडल्याचा प्रकार आज (बुधवार) सकाळी उघडकीस आला आहे. चोरट्यांनी दुकानातील महागड्या जीन्स आणि शर्ट्स लंपास केले आहेत. दरम्यान, चोरी झालेल्या दुकानाच्या शेजारी दोन ठिकाणी बांधकाम सुरू असून तिथे सुरक्षारक्षक असतानाही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, खान्देश कॉम्प्लेक्समध्ये दुकान क्रमांक ७२ मध्ये जावेद फारुख खान यांच्या मालकीचे फ्रेंड्स मेन्स वेअर नावाने कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शटरचे कुलूप तोडून एका बाजूने शटर उचकवून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून २८ आणि ३२ साईजच्या ३० जीन्स पॅन्ट व एम साईजचे ४० शर्ट चोरून नेले आहेत. चोरट्यांनी दुकानातून एका बॅगमध्ये भरून कपडे सोबत घेतले. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी सुधीर साळवे आणि रतन गिते यांनी पाहणी केली आहे.


Protected Content

Play sound