जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र महात्मा फुले यांच्या विचारांवर आणि भारतीय संविधानिक मूल्यांवर उभी असलेली विद्यार्थी संघटना आहे. सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्रने पहिल्यांदा महात्मा फुले स्मृती दिवस हाच खरा शिक्षक दिवस असावा अशी मागणी करून प्रबोधन करायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्रने 26 नोव्हेंबर संविधान दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.
शिक्षक दिनाचे खरे मानकरी कोण?, आजच्या काळात सत्यशोधक विचाराचे महत्व, भारतीय संविधान आणि त्या समोरील आव्हाने, फुले-आंबेडकर यांचे शिक्षणासंर्भातील विचार, 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिवस हाच खरा शिक्षक दिवस !, सावित्रीबाई फुले यांचे स्री शिक्षण चळवळीतील योगदान सारखे विषय निबंध स्पर्धेसाठी देण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
दि. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त निबंध स्पर्धेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेवून लावण्यात आला. या ऑनलाईन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मार्क्सवाद, फुले, आंबेडकरवादचे भाष्यकार आणि डॉ. बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. उमेश बगाडे तसेच सत्यशोधक डेमोक्रेटिक पार्टीचे सचिव कॉ.सिद्धार्थ जगदेव हे उपस्थित होते. निबंध स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक मुळजी जेठा महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक भूषण धनगर, TISS चे विद्यार्थी आणि सवीस चे राज्य संघटक विजय वाघ, सत्यशोधक महिला आघाडीच्या वर्षा बढे, सविसचे राज्य सदस्य कवी जितेंद्र अहिरे कार्यक्रमा उपस्थित होते. त्याच बरोबर सत्यशोधक महिला आघाडीच्या सुप्रिया गायकवाड, सविसचे वरिष्ठ कार्यकर्ते मनीष खटावे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात फुले अखंडाने करण्यात आली सविसचे राज्याध्यक्ष सिद्धांत बागुल यांनी फुले अखंडाचे गायन केले तसेच राज्य सदस्य प्रवीण म्हस्के यांनी साऊ पेटती मशाल हे गीत गाऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रमाची प्रास्ताविका माजी राज्य सचिव विकास मोरे यांनी केले विकास मोरे यांनी सविसचे सांस्कृतिक लढे व भूमिका सांगून विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धे मागची भूमिका समजावून सांगितली. प्रमुख उपस्थितांचा परिचय अंकुश मेढे यांनी करून दिला तर निबंध स्पर्धेच्या परीक्षकांचा परिचय राज्य सचिव तुषार सूर्यवंशी यांनी करून दिला आणि सविसच्या राज्य कार्यकारणीचा परिचय देखील जयेश पठाडे यांनी स्पर्धकांना करून दिला.
सहभागी स्पर्धकांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात उमा सौदागर, आमिर इनामदार, अश्लेषा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. परिक्षकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात वर्षा बढे यांनी त्यांना आलेला अनुभव सांगत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. उमेश बगाडे यांनी निबंध स्पर्धेद्वारे वाढणारी चिकित्सक वृत्ती व म.फुले समग्र वाङ्मय यावर भाष्य करत मार्गदर्शन केले निबंध स्पर्धेच्या निमित्ताने सत्यशोधक समाजाचा दाखला देत निबंध स्पर्धा आणि त्यातून सध्या होणारा हेतू यावर देखील बोलतांना डॉ. उमेश बगाडे म्हणाले की जेव्हा आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात व्यस्त असतो तेव्हा चिकित्सक पद्धतीने समाजाकडे पाहायला वेळ मिळत नाही परंतु निबंध स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वाचायला मिळाले आणि त्यातून विद्यार्थी लिहिते झालेत. सोबतच डॉ. उमेश बगाडे यांनी विद्यार्थी संघटनेचे अभिनंदन करत निबंध स्पर्धा आयोजित केल्या बद्दल विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सविसचे राज्यसचिव तुषार सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपाली भालेराव यांनी केले.
निबंध स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे असून निकालाचे वाचन प्रसेनजित जगदेव, प्रवीण मस्के, राकेश अदरलवार, तुषार सूर्यवंशी, सुरेश सानप यांनी केले.
•मराठवाडा विभाग –
1) प्रथम -उमा सौदागर- आजच्या काळातील सत्यशोधक विचारांचे महत्त्व.
2) द्वितीय- पंचशीला अलाटे- महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणा संदर्भातील विचार.
3) तृतीय-निकिता शिंदे- सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण चळवळीतील योगदान.
4) उत्तेजनार्थ – पल्लवी शिरसागर -आजच्या काळातील सत्यशोधक विचारांचे महत्त्व.
•कोकण विभाग –
1) प्रथम – श्वेता सावंत – सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण चळवळीतील योगदान.
2) द्वितीय – समृद्धी मुसळे – शिक्षक दिनाचे खरे मानकरी कोण?
3) तृतीय- प्रथमेश धायगुडे- भारतीय संविधान आणि त्या समोरील आव्हाने.
4) उत्तेजनार्थ – आश्लेषा कांबळे – भारतीय संविधान आणि त्यासमोरील आव्हाने.
•पश्चिम महाराष्ट्र विभाग –
1) प्रथम – विप्लाय देसाई – 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिवस.
2) द्वितीय – अमीर इनामदार – भारतीय संविधान आणि त्या समोरील आव्हाने.
3) तृतीय – ॲड. रूपाली हिरवे – सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण चळवळीतील योगदान.
•खान्देश विभाग –
1) प्रथम – मोहिनी खलाणे – भारतीय संविधान आणि त्यासमोरील आव्हाने.
2) द्वितीय- काशिनाथ वर्देकर -सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण चळवळीतील योगदान
3) तृतीय – वृषाली गिरासे – सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण चळवळीतील योगदान
4) उत्तेजनार्थ- सुष्मिता माहिदे -भारतीय संविधान आणि त्या समोरील आव्हाने.
•खान्देश विभाग विशेष पारितोषिक
विशेष 1. दिव्या दिपक भोई
विशेष 2. लतिका विनोद पाटील
•विदर्भ विभाग –
1)निकिता इंगळे ,प्रथम – 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिवस.
2) आर्य वसू – द्वितीय- भारतीय संविधान आणि त्या समोरील आव्हाने.
3)आचल वाघमारे ,तृतीय – भारतीय संविधान आणि त्या समोरील आव्हाने
4)स्नेहा पाटील,उत्तेजनार्थ- सावित्रीबाई फुले व त्यांचे स्त्रीशिक्षणातील योगदान
रेपोर्टिंग – प्रसेंजीत जगदेव