Home Cities जळगाव राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे निधन

राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे निधन

0
110

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांचे आज उपचार सुरू असतांना निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी रमेश डोंगर शिंदे (वय ५४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. रमेश शिंदे हे महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या हितासाठी सातत्याने महासंघाच्या माध्यमातून प्रयत्नशील असायचे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी- अधिकारी संघटनेचेही ते सचिव होते. त्यांच्या निधनाने राज्यातील विद्यापीठ कर्मचार्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून शैक्षणीक वर्तुळातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound