Home क्राईम आंतरजातीय विवाह ; दलित तरुणाची निर्घृण हत्या

आंतरजातीय विवाह ; दलित तरुणाची निर्घृण हत्या

340796 gujahedhe
340796 gujahedhe

340796 gujahedhe

अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका दलित तरुणाने उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील एका तरुणीसोबत विवाह केल्यामुळे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तरुणीच्या कुटुंबीयांनी ‘महिला हेल्पलाईन’ सदस्यांसमोरच या तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली.

 

मृत तरुणाचे नाव हरेश सोलंकी (वय २५) आहे. हरेश आणि उर्मिला झाला यांचे प्रेम महाविद्यालयात बहरले. दोघांनीही विवाहाचा निर्णय घेतला. परंतु, हरेश दलित वर्गातून असल्याने तरुणीच्या कुटुंबाचा मात्र, या विवाहाला नकार होता. परंतु, त्यांच्या नकाराला झुडकारून हरेश आणि उर्मिलाने प्रेमविवाह केला. लग्नानंतर उर्मिलाच्या कुटुंबीयांनी आपली या लग्नाला मान्यता असल्याचे भासवत उर्मिलाला आपल्या घरी नेले. परंतु, नंतर मात्र त्यांनी उर्मिलाला हरेशसोबत पाठवण्यास नकार दिला. हरेशने सरकारी १८१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करत ‘अभयम’ची मदत घेतली. सोमवारी सायंकाळी, उर्मिलाच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या ‘अभयम’ची सदस्य आणि हरेशवर जमावाने जीवघेणा हल्ला केला. ‘अभयम’ची गाडीही फोडण्यात आली. ‘अभयम’च्या सदस्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.


Protected Content

Play sound