Home Cities अमळनेर निंब येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भक्तांच्या उत्साहाला उधाण !

निंब येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भक्तांच्या उत्साहाला उधाण !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निंब येथील तापी नदी आणि पांझरा नदीच्या पवित्र परिसरात श्री सदगुरू पुण्यक्षेत्रम निंब येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी सकाळी श्री दत्तात्रेय उदी कुंभाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात सर्व भक्त तल्लीन होऊन सहभागी होत होते. या मिरवणूकीत जळगाव, नंदुरबार, शिरपूर, अमळनेर येथील भक्तांनी विशेष सहभाग नोंदविला.

सकाळी ८ वाजता श्री दत्त कैवल्य याग ने सुरूवात करण्यात आली. सकाळी १० वाजता श्री दत्तात्रेय उदी कुंभाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात सर्व भक्त तल्लीन होऊन सहभागी होत होते. या मिरवणूकीत जळगाव, नंदुरबार, शिरपूर, अमळनेर येथील भक्तांनी विशेष सहभाग नोंदविला. महिलांनी फेटे बांधुन तसेच पुरुषांनी सारखा पोषाख परिधान केला होता. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या गजरात सर्व भक्त भक्तिमय वातावरणात सहभागी झाले होते. भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते.

सकाळी ११ वाजता पालखी मुख्य मंडपात आल्यावर पूजन झाले, दुपारी १२ वाजता दत्त आरती बरोबर स्वामी समर्थ, साई नाथ, सदगुरू श्री अनिरुद्ध यांच्या आरत्या झाल्या. प्रदक्षिणा आरतीने वातावरण भक्तिमयरीत्या भारावून गेले. तापी नदी आणि पांझरा नदीच्या पवित्र परिसरात हा उत्सव साजरा झाला. गुरु गीतेच्या पठणा सोबत आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट केली होती. मंडपात गुढ्या, तोरणे, केळीचे खांब लावून वातावरण पवित्र आणि प्रसन्न झाले होते.

ह्या उत्सवासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रा तून भक्त आले होते. परिसरातील ग्रामीण भागातील भक्त पण सहभागी झाले होते. शिस्तबद्ध आणि पर्यावरण पूरक उत्सवाचे सूक्ष्म नियोजन केले होते. ह्या परिसरात मार्गशीर्ष महिन्यात श्री वर्धमान व्रताधीराज उपासनेचे देखील आयोजन केले आहे.


Protected Content

Play sound