भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील हबर्डिकर चाळ परिसरामधून एका वृद्धाचे बंद घर फोडून घरातून सुमारे 5 लाख 57 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील हंबर्डिकर चाळ परिसरामध्ये अरुण दोदू चौधरी वय 68 हे वृद्ध व्यक्ती आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. 8 ते 9 नोव्हेंबर दरम्यान त्यांचे बंद घर फोडून घरातून रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 57 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता घरात चोरी झाल्याची लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चोरी झाल्याबाबत माहिती घेतली. परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे हे करीत आहे.