धनाजी नाना महाविद्यालयात संविधान दिन साजरा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात 26 नोव्हेंबर संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी, माजी प्राचार्य प्रा. डॉ. जी पी पाटील, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्य प्रा डॉ कल्पना पाटील, प्रा डॉ डी एल सूर्यवंशी, एनएसएस सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि एन एस एस चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी उपस्थित मान्यवरांना व एनएसएसच्या स्वयंसेवकांना संविधान उद्देशिकेची शपथ देवून जनमानसात जावून संविधान जनजागृती करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील एनएसएसचे स्वयंसेवक खिलचंद धांडे, आयुष वाघुळदे, चिन्मय सोनवणे, वैशाली शिंदे, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content