Home क्राईम मेटेपारजवळ वाघिणीसह २ बछड्यांच्या मृत्यू ; परिसरात प्रचंड खळबळ

मेटेपारजवळ वाघिणीसह २ बछड्यांच्या मृत्यू ; परिसरात प्रचंड खळबळ

70123734
70123734

70123734

चंद्रपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

मेटेपार गावालगतच्या तलावाजवळ काही जण सोमवारी सकाळी जांभळे तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत त्यांनी पाहिले आहेत. दोन्ही बछडे साधारण आठ ते नऊ महिन्यांचे आहेत. या घटनेची माहिती पसरताच गावकऱ्यांनी मृत वाघीण आणि बछड्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांना कळवले. वन अधिकारी आणि संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचत, त्यांनी पाहणी केल्यावर थोड्या अंतरावर एक चितळही मृतावस्थेत सापडले. वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे आताच सांगता येणार नाही. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.


Protected Content

Play sound