नागपूर (वृत्तसंस्था) रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला खाजगी ट्रॅव्हल धडकल्याने झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. तर 10 प्रवाशी जखमी झालेत. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या पचगाव शिवारात रविवारी रात्री घडली. रविवारी रात्री नागपुरच्या दिशेने यायला ही बस निघाली होती.
या संदर्भात अधिक असे की, महालक्ष्मी ट्रॅव्हलची ही बस ब्रम्हपुरीवरून नागपूरला येत असताना उमरेड मार्गावर पचगाव शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला भरधाव बसने धडक दिली. या अपघातात बसच्या चालकासह बसमधील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.