जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शेरा चौक परिसरात राहणाऱ्या अपक्ष उमेदवाराच्या घरावर दोन दुचाकींवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दोन वेळा गोळीबार केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता उघडकीला आले आहे. मुक्ताईनगर नंतर अपक्ष उमेदवाराव गोळीबार करण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यानुसार एमआयडीसी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीला सुरूवात केली आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शेरा चौकात राहणारे एमआयएमचे ते माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख (वय ५०) हे जळगाव शहर विधानसभा निवडणूकीसाठी अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे. सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास शेरा चौकातील नागरिक साखर झोपेत असताना दोन दुचाकींवर आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी दोन गोळीबार करण्यात आले. यामुळे घरावरील खिडकीचा काच फुटला. ही घटना घडल्यानंतर कुटुंबिय जागे झाले आणि एमआयडीसी पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून या अनुषंगाने पुढील तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.