माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटलांनी केले गृहमतदान

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क कोथरूड विधानसभा मतदारसंघात बजावला आहे. त्यांनी गृह मतदानाच्या सुविधेचा वापर केला असून भारत निवडणूक आयोगाचे आभार मानले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान नोंदवून घेण्यात येत आहे. त्यापैकी आज ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ९१ जेष्ठ नागरिक तसेच ४ दिव्यांग मतदार असे एकूण ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.या प्रक्रियेकरिता विधानसभा मतदारसंघात एकूण आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

Protected Content