अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्यावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात विनापरवाना अवैधपणे गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री करणाऱ्या एकावर एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. त्याच्याकडून ३८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री ९.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात संशयित आरोपी संतोष हुकूमतमल राजपाल हा विनापरवाना अवैधपणे गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत संतोष राजपाल याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून ३८ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष हुकूमतमल राजपाल रा. सिंधी कॉलनी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे.

Protected Content