Home क्राईम धरणगावात पान टपरी फोडली; ५० हजाराचा ऐवज लंपास

धरणगावात पान टपरी फोडली; ५० हजाराचा ऐवज लंपास

0
100

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील उड्डाण पूलालगत असलेले एक पान दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी फोडून ५० हजारहून अधिकचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.धरणगावातील उड्डाण पूलालगत सुरेश गोरख रोकडे यांच्या मालकीचे पान दुकान आहे.

गुरुवारी रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करून ते घरी निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री टॉमीच्या सहाय्याने पान टपरीचा दरवाजा तोडून आतील 50 हजारराचा माल व 3 हजाराची चिल्लर सहित बँकेचे कागदपत्रे चोरून नेले आहे. घटनेची माहिती मिळताच पो.नि पवन देसले यांनी घटनास्थळ गाठले. तसेच आपल्या सहकाऱ्यांना पंचनामा करून तपासाबाबत सूचना केल्यात.

 


Protected Content

Play sound