यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील राजोरा फाट्यानजीक भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.कमलाकर सखाराम महाजन (वय ५५) रा. अट्रावल ता. यावल असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल येथील कमलाकर सखाराम महाजन (वय ५५) हे मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी दुचाकी (एमएच १९ बीडब्ल्यू ८०३१) द्वारे अट्रावल येथून भुसावळकडे जात असताना राजोरा फाटा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कमलाकर महाजन हे गंभीररित्या जखमी झाले. खासगी वाहनातून त्यांना तातडीने जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात नातेवाईका शुभम महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.