तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यात १८ व १९ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील आठही मंडळात सतत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने सरसकट पंचनामे करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले.


या पावसामुळे मका, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांना कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालूक्यातील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे अन्यथा पुढील महिन्यात होणाऱ्या विधान सभेच्या निवडणूकीत मतदानाचा बहिष्कार करु असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मका, ज्वारी या पिकांच्या कणीसांना कोंब फुटल्याने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दाखविण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेस कमिटी किसान सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, बाजार समितीचे उपसभापती कृषिभूषण सुरेश पाटील, योगेंद्रसिंग राजपूत, अंबालाल राजपूत, किरणसिंग राजपूत,प्रताप पाटील, विठ्ठल पाटील,संदीप मल्हारी पाटील, धनगर पाटील,त्र्यंबक पाटील, गोविंदा पाटील,अरुण पाटील, भगवान संदानशिव,प्रभाकर धनगर, वामन पाटील, संतोष चौधरी, सुनील पाटील, प्रभाकर भिल,दिनेश पवार आदी शेतकऱ्यांचा सह्या आहेत. दरम्यान विधान सभा निवडणुक जवळ आल्याने प्रशासन निवडणूकीच्या कामाला लागल्याने पंचनामा बाबत दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content