जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडी व शिंदे गटाने अद्याप नावे जाहीर केली नसून याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यात जामनेर-निरीश महाजन, जळगाव-राजूमामा भोळे, भुसावळ-संजय सावकारे या चार विद्यमान आमदारांसह रावेर-यावलमधून अमोल हरीभाऊ जावळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यासोबत वंचित बहुजन आघाडीने रावेर-यावलमधून शमीभा पाटील तर भुसावळमधून जगन सोनवणे यांना तिकिट दिले आहे. तसेच रावेर-यावलमधूनच प्रहार ज नशक्ती पक्षाने अनिल चौधरी यांना मैदानात उतारले आहे.
महाविकास आघाडीच्या अकरा तसेच शिवसेना शिंदे गटाच्या पाच उमेदवारांची नावे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. यात काँग्रेस, शिवसेना-उबाठा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तसेच अजित पवार गट यांनी मात्र अद्यापही उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. यात आज बहुतांश पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.